भाजपने किरीट सोमय्या यांचा बळी दिला!
मुंबई : खरा पंचनामा
भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्यांसारख्या बड्या राजकीय नेत्याचा खासगी व्हिडीओ व्हायरल होत असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच यावर वेगवेगळ्या चर्चाही होत आहे. यावर आता राज्यातील राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यावर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.
भाजपने मोठ्यात मोठी प्रकरण लिलया जिरवून टाकली. पण सोमयाचा व्हिडीओ आत्ताच का यावा? महाराष्ट्र हिताच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरलेली भाजपा आमदार खरेदी-विक्री, पक्ष फोडाफोडी, या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला वेगळं वळण देण्यासाठी भाजपाने किरीट सोमय्यांचा बळी दिलाय, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
या सगळ्या प्रकरणावर काय बोलणार ? भाजपचं राजकारण घाणेरडं झालं आहे. कधी नव्हे ते या गोष्टी समोर येत आहे. २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यापासून राजकारणाचा स्तर घसरला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे दाखवलं गेलं आहे. महाराष्ट्राची प्रतिमा आता डागाळली आहे. व्हिडीओची सत्यता पडताळल्यानंतरच प्रतिक्रिया देता येईल. मात्र राज्यतल्या सरकारची मानसिकता विचारांना कलंक लावणारी आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.