Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फेमा उल्लंघन प्रकरणी टीना अंबानींची ईडीकडून चौकशी सुरू!

फेमा उल्लंघन प्रकरणी टीना अंबानींची ईडीकडून चौकशी सुरू!



मुंबई : खरा पंचनामा

उद्योगपती अनिल अंबानी यांची फेमा कायद्याच उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सोमवारी मुंबईतील ईडी कार्यालयात पोहोचले होते. येस बँकेच्या कर्ज प्रकरणात बँकेचे सह- संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आलेल्या प्रकरणात अनिल अंबानी यापूर्वी 2020 मध्ये ईडीसमोर हजर झाले होते.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने 420 कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणात अंबानींना दिलासा दिला होता. तसेच आयकर विभागाला अनिल अंबानींवर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये असे सांगितले होते. मार्च 2020 मध्ये, अनिल अंबानी यांना ईडीने येस बँकेच्या एक्सपोजरच्या संदर्भात एडीएजी च्या स्थानाबाबत चौकशी केली होती.

रिलायन्स समूहाच्या प्रवक्त्यानुसार, अंबानी यांनी ईडी अधिकाऱ्यांना सांगितले होते की, एडीएजी आणि येस बँक यांच्यातील सर्व व्यवहारांमध्ये कायद्याचे आणि आर्थिक नियमांचे पालन केले आहे.

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि इतरांच्या संबंधात, अंबानी म्हणाले होते की, रिलायन्स समूहाचा कपूर, त्यांची पत्नी किंवा मुली किंवा त्यांच्याद्वारे नियंत्रित कोणत्याही संस्थेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क नाही. दरम्यान आता निता अंबानी या देखील ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. या प्रकरणात आता कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.