Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गायरानमधील अतिक्रमणे कायम करण्यासाठी मुंबईत बुधवारी मोर्चा : राजू शेट्टी

गायरानमधील अतिक्रमणे कायम करण्यासाठी मुंबईत बुधवारी मोर्चा : राजू शेट्टी





कोल्हापूर : खरा पंचनामा

गायरान, गावठाण व वन विभागातील जमिनीवरील अतिक्रमणे कायम कराव्यात, या मागणीसाठी १९ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान ते विधानभवन असा प्रागतिक पक्षांच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने विशाल मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.

ते म्हणाले की, देशात स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून लाखो गरीब लोक हे भूमिहिन आहेत. इंग्रज सरकारने, हैद्राबाद नवाबाने या लोकांना सरकारी जमिनी, बतने, इनाम दिल्या होत्या. तेच लोक आज अतिक्रमणधारक असल्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवून पुन्हा या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याचे सरकारी षडयंत्र सुरु आहे. राज्यातील गायरान व सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारक संघटना राज्यभर एकत्रीत आले असून भूमि अधिकार मोर्चा महाराष्ट्र राज्य या बॅनरखाली राज्यात गायरान प्रश्नांवर धरणे प्रदर्शने, स्थानिक मोर्चे काढल्यानंतर १९ जुलै रोजी विशाल मोर्चा आझाद मैदानातून निघणार आहे.

या मोर्चात बी. आर. एस. पी., माकप, भाकप, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, जनता दल (सेक्युलर) समाजवादी पार्टी, आर.पी.आय. (सेक्युलर), एकलव्य सेना, लाल निशान पक्ष, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्यूनिस्ट पार्टी आदी पक्ष मोर्चात सहभागी होणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.