बिसूरमध्ये बिबट्याचा वावर; वनविभाग पाच तासाने दाखल
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील बिसूर येथे काल रात्रीपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. गावातील एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या दिसला आहे. याची माहिती वन विभागाला देण्यात आली, मात्र तब्बल पाच तासाने वनविभागाचे लोक तेथे आले. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
बिसूरमध्ये बिबट्या आल्याची माहिती मिळताच मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, प्राणीमित्र मुस्तफा मुजावर, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी धाव घेतली. कर्नाळ परिसरात काही दिवसांपुर्वी दिसलेला हा बिबट्या असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बिसूर येथे गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सोमवारी रात्री अकराच्या सुमारास तेथील एका दुकानाच्या सीसीटीव्हीत तो कैद झाला. तो व्हिडिओ वाऱ्यासारख्या परिसरात व्हायरल झाला. त्यानंतर तातडीने नागरीकांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली.
प्राणीमित्रांसह स्थानिकांनी आज दिवसभर त्याचा शोध घेतला. काही ठिकाणी पायांचे ठसेही मिळून आले. सायंकाळी तो ओढ्यालगतच्या परिसरात गेला. त्यानंतर पाच तासांनी वनविभागाची टीम दाखल झाली. त्यांनीही शोध मोहिम राबवण्यास सुरूवात केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.