विवाहिता आत्महत्या प्रकरण : कारागृह हवालदारासह तिघांना अटक
पुणे : खरा पंचनामा
सुनेला नीट स्वयंपाक करता येत नाही म्हणून मानसिक व शारीरीक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल कारागृह पोलीस हवालदारासह तिघांना येरवडा पोलिसांनी अटक केली.
पोलीस हवालदार माणिक भवार, बाळू भवार, शाहाबाई भवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आश्विनी बाळु भवार (वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत अश्विनीची आई सुनंदा परमेश्वर पवार (वय ४७, रा. पवडुळ जि. बीड) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती, सासू, सासरे व दीरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१५ पासून २८ जुलै २०२३ दरम्यान घडला.
माणिक भवार हे येरवडा कारागृहात हवालदार असून जेल वसाहतीत राहतात. त्यांचा मुलगा बाळु आणि अश्विनी यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. आश्विनी हिला किरकोळ कारणावरुन मारहाण व शिवीगाळ केली जात होती. तुला नीट स्वंयपाक करता येत नाही भांडी घासता येत नाहीत, असे म्हणून वारंवार शिवीगाळ करत होते. या छळाला कंटाळून आश्विनी हिने जेल वसाहतीत २८ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.