बिल काढण्यासाठी लाच म्हणून मागितले ब्लॅक डॉगचे दोन खंबे!
जालना : खरा पंचनामा
जालना जिल्ह्यातील बदनापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भूमिगत नाल्याच्या बांधकामाची रक्कम अदा करण्यास परवानगी देण्यासाठी ग्रामसेवकाने लाच मागितली. सध्या त्याने लाच म्हणून जी मागणी केली आहे त्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. या ग्रामसेवकाने सात हजार रुपये आणि ब्लॅकडॉग दारूचे दोन खंबे लाच म्हणून मागितले.
बदनापूर तालुक्यातील मांजरगाव भूमिगत नाल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. या कामाचे उर्वरीत 1 लाख 48 हजार 467 रुपयांचा निधी बांधकाम करणारे मजुरांना व बांधकाम साहित्य देणारे दुकानदार यांना अदा करावयाची होती. त्यासाठी परवानगी लेटरवर गट विकास अधिकारी, पंचायत समिती बदनापूर यांची सही घेण्याची गरज होती. ही सही देण्यासाठी सिद्धार्थ घोडके यांनी 20 जून रोजी तक्रारदार यांना पंचासमक्ष 7 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.