यंदाची आषाढी वारी पहिल्यांदाच ठरली अपघात मुक्त!
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे परफेक्ट नियोजन
कोल्हापूर : खरा पंचनामा
संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या पंढपुरातील विठ्ठलाची यंदाची वारी मोठ्या उत्साहात पार पडली. भाविक पंढरपुरात पोहोचेपयर्त त्यांना मिळालेल्या सुविधा आणि पोलिस बंदोबस्ताच्या सुयोग्य नियोजनामुळे यंदाची वारी अपघातमुक्त ठरली आहे. यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि त्यांच्या चमूने केलेल्या परफेक्ट नियोजनामुळे यंदाची आषाढी वारी भक्तीभावात आणि भाविकांच्या सुरक्षेत पार पडली.
पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी विशेष महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी दोन महिने आधीच तयारी सुरू केली होती. भाविकांना देणाऱ्या सूचनांचे फलक जागोजागी लावण्यात आले होते. आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आले होते. श्री. फुलारी यांनी केवळ पोलिस बंदोबस्ताकडे लक्ष न देता वारकऱ्यांच्या निवास, अपघात विमा, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा याकडे विशेष लक्ष दिले होते. त्याशिवाय संपूर्ण वारी पार पडेपर्यंत बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस अधिकारी, कमर्चारी यांच्या सोयी सुविधांकडेही विशेष लक्ष दिले होते. त्यानुसार त्यांनी आधीच नियोजन केले होते.
कोल्हापूर परिक्षेत्रात वारी आल्यानंतर पोलिस बंदोबस्ताशिवाय ड्रोन कॅमेरे, साध्या वेशातील पोलिस यांचा कडक वॉच होता. या सर्व नियोजनावर श्री. फुलारी स्वतः लक्ष ठेऊन होते. त्याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच अन्य व्हीआयपी लोकांच्या बंदोबस्तात कोठेही कसून राहिली नाही. त्यातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव त्यांच्या संपूर्ण मंत्रीमंडळासह विठुरायाच्या दर्शनाला एकादशीच्या आधीच आले होते. या सर्व व्हीआयपी लोकांचा बंदोबस्त अत्यंत चोखपणे पार पाडण्यात आला.
महिला भाविकांना त्रास होऊ नये म्हणून चंद्रभागातिरी चेंजिंग रूम तयार करण्यात आल्या होत्या. तेथे महिला पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. त्याशिवाय हिरकणी कक्षही स्थापन करण्यात आले होते. तेथेही महिला पोलिस तैनात करण्यात आले होते. दर्शनावेळी कोठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी दर्शन रांगेतील नेहमीच्या बंदोबस्ताशिवाय २५० स्वयंसेवक आणि कमांडो तैनात करण्यात आले होते. भाविकांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली होती. भाविकांना क्लॉक रूमचीही व्यवस्था करून देण्यात आली होती.
एकंदरीत कोल्हापूर परिक्षेत्रात विविध महनीय संत, मानाच्या पालख्यांच्या संपूर्ण प्रवासात तसेच प्रत्यक्ष आषाढी एकादशीदिवशी किरकोळ अपवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार न होता यंदाची वारी पार पडली. याचे सारे श्रेय कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी तसेच त्यांच्या पोलिस चमूला जाते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.