विट्यात सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडीओ करत दांपत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
सांगली : खरा पंचनामा
विटा शहरात एका दांपत्याने सोशल मीडियावर लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रस्ता मिळत नसल्याने पती-पत्नीने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दोघांवर विटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दोघांनी आपल्या घराकडे आणि शेताकडे जाणा-या रोडला परवानगी मिळत नसल्याच्या कारणातून आत्महत्याचा प्रयत्न केल्याचं समोर आले असले तरी प्रशासकीय अधिकारी यांनी संबंधित विषय हा तहसीलदाराच्या अखत्यारीतला विषय नाही असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सध्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते. या दांपत्याने एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी तहसीलदाराकडून आपले काम होत नसल्याचा आरोप केला आहे. दरम्यान त्यांनी यापूर्वी या रस्त्यासाठी उपोषण केले होते. त्यावेळी त्यावर मार्ग काढण्यात होता असे सांगितले जाते.
याबाबत विटा पोलिस ठाण्यात अद्याप कसलीही नोंद नसल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.