आम्ही घरातले भांडतोय आणि भाजप मजा घेत आहे!
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपवर पक्ष आणि कुटुंब फोडल्याचा आरोप केला. भाजपने योग्य पद्धतीने डाव खेळला आहे, असे ते म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता जपण्यासाटी शिवसेना पक्ष काढला आणि भाजपने तो पक्ष फोडला, अशी टीका त्यांनी यावेळी केली. यासोबतच अजित पवारांसोबत गेलेल्या बंडखोर नेत्यांनाही अनेक खोचक सवाल केले.
रोहित पवार म्हणाले की, आज देशभरात भाजपविरोधात वातावरण तयार होत आहे. त्याबद्दल कुणी काही बोलू नये, मोठे नेते आपापसात गुंतवून राहावेत, यासाठी भाजपने आधी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. आम्ही आमच्यातच उत्तर- प्रत्युत्तर देत आहोत आणि तिकडे भाजप बाजुला राहत आहे. पक्ष फोडण्याचे खापर अजितदादांवर फोडले जात आहे. अजित दादांना विलेन ठरवण्याचे काम चार-पाच नेते करत आहेत. तिकडे भाजप एसीत बसून मजा पाहत आहे आणि आम्ही आमच्यातच भांडतोय, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
भाजपसोबत गेलेले आज म्हणत आहे की, आम्ही विकासासाठी हा निर्णय घेतला. मग तुम्ही पदावर असताना विकास केला नाही का, असा प्रश्न सामान्यांना पडतोय. या सगळ्या घडामोडी होत होत्या, तेव्हा माझ्या आई-वडीलांनी मला प्रश्न केला की, तू वयस्कर होशील, 80च्या पुढे जाशील, तेव्हा अशीच भूमिका घेणार का? माझ्याच आई-वडिलांना हा प्रश्न पडत असेल, तर सामान्यांना पडणारच ना.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.