अजित पवारांनी ट्वीटरच्या 'बायो'मध्ये केला 'असा' बदल, पण...
मुंबई : खरा पंचनामा
अजित पवारांनी ट्वीटरच्या 'बायो'मध्ये बदल केला असून 'डेप्युटी चिफ मिनिस्टर, महाराष्ट्र' असा उल्लेख त्यांनी केला आहे. शिवाय त्यांनी 'एनसीपी लिडर' हे मात्र कायम ठेवलं आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.
दरम्यान अजित पवार यांच्या या बंडानंतर जयंत पाटलांच्या घरी हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड जयंत पाटलांच्या भेटीला गेले आहेत. अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी जयंत पाटलांच्या भेटीला जात आहेत. शरद पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून शरद पवारांची भूमिका माहविकास आघाडी बरोबर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या यॉर्करवर राष्ट्रवादीचा त्रिफळा उडाला. उध्दव ठाकरे हिट विकेट आणि संजय राऊत स्वतःच्या पायात अडकून पडून रन आऊट, असं ट्वीट नारायण राणे यांनी केलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.