राष्ट्रवादी फोडणाऱ्या प्रवृत्तीला जागा दाखवून देणार!
कराड : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणाऱ्या प्रवृत्तीना त्यांची जागा दाखवून देणार असा इशारा शरद पवार यांनी कडारमध्ये बोलताना दिला आहे. 'काही समाज विघातक प्रवृत्तीकडून महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका घेतली जात आहे. त्याला तुमचे, माझे सहकारी बळी पडले आहेत. परंतु सामान्य माणूस एकवेळ उपाशी राहील, पण महाराष्ट्राची शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. तसेच या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही', असे शरद पवार यावेळी म्हणाले.
आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने शरद पवार यांनी कराडमधील प्रिती संगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेतले. तसेच राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर पवारांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. यावेली बोलताना पवार यानी भाजपला अप्रत्यक्ष जागा दाखवून देण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, देशात आणि राज्यात चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे अधिकारांचं जतन केलं करण्याची गरज आहे. याच प्रवृत्तीकडून राज्यात जातीय तेढ, दंगे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या समाज विघातक प्रवृत्तीच्या विरोधात लढण्याची वेळ आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू-फुले आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रात या प्रवृत्तीने पक्षांना धक्का देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका या प्रवृत्तींनी घेतली आहे. त्याला तुमचे माझे सहकारी बळी पडले आहेत. परंतु सामान्य माणूस एकवेळ उपाशी राहील. परंतु महाराष्ट्राची शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. या प्रवृत्तीना राज्यातील सामान्य माणूस त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. या प्रवृत्तीला बाजूला करून पुन्हा एकदा महाराष्ट्रात कष्टकऱ्यांच आणि सर्वासामन्यांचं राज्य प्रस्थापित करू असा निर्धार देखील शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.