नवाब मलिक जाणार अजितदादांच्या गटात?
मुंबई : खरा पंचनामा
राज्याच्या शिवसेनेच्या बंडानंतर राष्ट्रवादीनेही बंड केलं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला आणि मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. त्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर पक्षातील एकुण आमदारापैकी किती आमदारांनी अजित पवार गटाला आणि शरद पवार गटाला पाठिंबा दिला याबाबत स्पष्टता हळूहळू दिसू लागली.
दरम्यान ज्या नेत्याने आणखी कोणालाही पाठिंबा दिला नाही त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुरुगांत असलेले राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची भूमिका स्पष्ट झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक विधान भवनात विभागातील कामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेणार भेट घेणार आहेत. काल कप्तान मलिक यांनी पक्ष कार्यालयात नेत्यांच्या भेटीसाठी आले होते, मात्र त्यांची भेट झाली नाही. नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक अजित पवार यांची भेट घेणार असल्याने नवाब मलिक यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.