Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राष्ट्रवादी राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या दिल्लीत बैठक : शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

राष्ट्रवादी राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या दिल्लीत बैठक : शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष



नवी दिल्ली : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पवारांनी पक्षातील पदाधिकारी, आमदारांसोबत चर्चा सुरू केली आहे. महाराष्ट्रातील दौऱ्याचीही आखणी करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी, आमदार, खासदार, राज्य कार्यकारणी, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर गुरुवारी 6 जुलै रोजी राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली आहे.

पक्षातल्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ही बैठक बोलावली आहे. पक्षावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी पवारांकडून पावले उचलण्यात येत आहेत. दिल्लीत होणाऱ्या याच वर्किंग कमिटीमध्ये पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. वर्किंग कमिटीच्या बैठकीत कोणाचे बहुमत दिसणार यावरही कायदेशीर लढाईचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय कार्यकारणीत अजित पवार यांची बाजू मांडणारे किती पदाधिकारी असतील, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार यांनी याआधीच पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणाने पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खजिनदार, खासदार सुनील तटकरे यांची बडतर्फ केले आहे. त्यामुळे आता गुरुवारी 6 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारणीत नेमकं काय घडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.