महिलेच्या गळ्यातील चेन चोरणाऱ्या
रेकॉर्डवरील जोशी बाईला अटक
दोन गुन्हे उघड : शाहूपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या रेकॉर्डवरील जोशी बाईला अटक करण्यात आली. तिच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. तिच्याकडून सव्वादोन लाख रुपयांचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई केली.
अनघा अनंत जोशी (वय ६२ रा. बसेरा शिवाजीनगर, रत्नागिरी सध्या रा. जाधववाडी कोल्हापूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
दिनांक 1 मे रोजी रोजी वैशाली यल्लाप्पा कोटगी (वय 44, रा. राहो जि. रायगड) या मुलीसह कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर आल्या होत्या. त्या गडहिंगलज येथे जाण्यासाठी बसमध्ये चढताना एका अज्ञात चोरट्याने त्यांचे गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसडा मारून चोरून नेली होती. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा रेकॉर्डवरील महिलेने केल्याची माहिती गुन्हे शोध पथकास माहिती मिळाली होती. संशयित महिला कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने आपण गेले काही महिन्यापूर्वी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक येथे व कराड जिल्हा सातारा मध्यवर्ती बस स्थानक येथे महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरल्याचे कबुली दिली.
ही महिला रेकॉर्डवरील गुन्हेगारअसून तिच्यावर यापूर्वी सांगली, रत्नागिरी, देवरुख, शिरोळ (जि. कोल्हापूर) अश्या वेगवेगळ्या ठिकाणी सोन्याचे दागीने चोरीचे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. तिच्याकडून सव्वादोन लाखांचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, शहर उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, उपनिरीक्षक श्वेता पाटील, संदीप जाधव, संदीप पाटील, नारायण कोरवी, मिलिंद बांगर, शुभम संकपाळ व लखनसिंह पाटील यांनी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.