Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी सिंगापूरमध्ये कट!

कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी सिंगापूरमध्ये कट!



बंगळुरू : खरा पंचनामा

सिंगापूरमध्ये राज्य सरकार पाडण्याचा कट रचला जात आहे, तशी माहिती मिळाली असल्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी येथे सांगितले. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, "काहीजण बंगळूरमध्ये राजकारण करण्याचे सोडून सिंगापूरला जात आहेत. या सगळ्याची आम्हाला जाणीव आहे. त्याचे डावपेच काय आहेत, हे मला माहीत आहे. राज्य सरकार पाडण्यासाठी अनेक कटकारस्थाने सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या असंतुष्ट वर्तुळात चिंता वाढली आहे.

अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्यासोबतच भाजप आणि संघ परिवारातील काही नेते काँग्रेसच्या असंतुष्ट आमदारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे." १३५ आमदारांच्या जोरावर स्थापन झालेले स्पष्ट बहुमताचे सरकार पाडणे अशक्य आहे, असा विश्वास असतानाही काही हालचाली संशय निर्माण करत आहेत.

निवडणूक निकाल जाहीर झाला, तेव्हा जनता दल नेते व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी त्यांच्या नातेवाईकांसोबत सिंगापूरमध्ये आराम करत होते. राजकीय गणिते उलटली आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतरच्या घडामोडींमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दल आणि भाजपने हातमिळवणी केली आहे.

धर्मनिरपेक्ष जनता दलच्या आमदार आणि नेत्यांनी बंगळूरमध्ये बैठक घेतली. त्यात जनता दल पक्ष भाजप आणि काँग्रेसपासून अंतर ठेवेल, असे स्पष्ट करून समांतर शक्ती म्हणून लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतरही पडद्यामागच्या राजकीय हालचालींना उधाण आले आहे. 'ऑपरेशन कमळ'ला पूरक अशी चर्चा सुरू असल्याच्या अफवा आहेत. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही त्याला दुजोरा दिला असून परदेशात सरकार पाडण्याचे षड्यंत्र असल्याचे सांगितले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.