अध्यक्षपदाबाबत अजित पवार यांची ती एक चूक?
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदार आणि नेत्यांसह बंड केलं आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात जात राज्य सरकारला पाठिंबा दिला आणि थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
मात्र एवढ्यावरच न थांबता अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावरही दावा सांगितला असून पक्षाचं नाव आणि चिन्ह आम्हाला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
मात्र या सर्व प्रक्रियेत अजित पवार यांच्या हातून एक चूक घडली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
३ जुलै रोजी शरद पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असं सांगणाऱ्या अजित पवार यांच्या पक्षाकडून आता ३० जून रोजीच अजित पवार यांची पक्षाकडून राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, असं एका प्रेस नोटच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जर ३० जून रोजीच अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे तर स्वत: अजित पवार यांनी ३ जुलै रोजी शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असं का म्हटलं, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.