Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लाचलुचपतच्या गळाला १७८ मासे! साडेपाच वर्षातील सांगली विभागाची कामगिरी

लाचलुचपतच्या गळाला १७८ मासे!
साडेपाच वर्षातील सांगली विभागाची कामगिरी



सांगली : खरा पंचनामा

काय 'द्या'च बोला म्हणत सर्वसामान्य, गरीब लोकांकडून लाच घेताना तब्बल १७८ मासे गळाला लागले आहेत. सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या साडेपाच वर्षांत ही कामगिरी केली आहे. या काळात १२९ केसेस करण्यात आल्या आहेत. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी नागरिकांनी लाचलुचपत कार्यालयाशी अथवा माझ्याशी थेट संपर्क साधा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमध्ये सर्वाधिक लाचखोर महसूल विभागातील असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. महसूल विभागात तब्बल ३७ केसेस ५२ जणांना अटक केली आहे. तर पोलिस विभागात २२ केसेस करत ३१ जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा परिषद विभागात १२ केसेस करत १८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर दहा केसेसमध्ये १३ खासगी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१८ मध्ये २२ केसेस करत ३१ जणांना अटक केली. २०१९ मध्ये २२ केसेस करत ३० जणांना अटक केली. २०२० मध्ये २२ केसेस करून २७ जणांना अटक करण्यात आली होती. २०२१ मध्ये २७ केसेस करत ३९ जणांना अटक करण्यात आली. २०२२ मध्ये २३ केसेस करत ३४ जणांना अटक करण्यात आली आहे. २०२३ मध्ये जुलैपयर्त १३ केसेस करत १७ जणांना अटक करण्यात आली आहे. 

लाचेच्या तक्रारीबाबत थेट संपर्क साधा : उपअधीक्षक पाटील
दरम्यान नागरिकांना शासकीय कामासाठी लाच मागितली जात असल्यास त्यांनी सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा. १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तरी तक्रारीची दखल घेण्यात येईल. तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. शिवाय अन्य काही तक्रारींबाबत थेट माझ्याशी ९८२१८८०७३७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.