Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मनपाच्या निवृत्त सहायक आयुक्तांच्या मुलास अटक बोगस बांधकाम परवाना प्रकरण : कंत्राटी कर्मचाऱ्याचाही समावेश

मनपाच्या निवृत्त सहायक आयुक्तांच्या मुलास अटक
बोगस बांधकाम परवाना प्रकरण : कंत्राटी कर्मचाऱ्याचाही समावेश



सांगली : खरा पंचनामा 

सांगली महापालिकेचा बोगस बांधकाम परवाना दिल्याप्रकरणी निवृत्त सहायक आयुक्त यांचा यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. शिवाय नगररचना विभागातील एका कंत्राटी कामगारालाही अटक करण्यात आली आहे.

राहूल उर्फ सोमनाथ रमेश वाघमारे (वय ३०, रा. नेमिनाथनगर, विश्रामबाग), कंत्राटी कर्मचारी महादेव नारायण पाटील (वय ३५ रा. कापूसखेड, ता. वाळवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख म्हणाले, सांगलीतील पवनकुमार बापू झेंडे आणि संतोष संजय झेंडे या दोघांचा मोकळा प्लॉट आहे. त्यावर बांधकामासाठी पालिकेचा परवाना घेण्यासाठी ते एजंट वाघमारे यांच्याकडे गेले होते. कागदपत्रे सोपवल्यानंतर काही दिवसात महापालिकेचा बांधकाम परवानाही देण्यात आला. नंतर श्री. झेंडे यांना परवाना कसा मिळाला याची माहिती शेजाऱ्यांनी घेतली असता हा परवानाच बोगस असल्याचे समोर आले. 

त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली. पालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. परवान्यावर बनावट शिक्का व स्वाक्षरी असल्याचे समोर आले. या परवान्यासाठी पालिकेकडे प्रस्तावच दिला नाही. विकास शुल्कही भरलेले नाही. त्यानंतर पालिकेचे कनिष्ठ अभियंता शाहबाज रहिम शेख यांनी १६ जूनला झेंडे बंधूसह चौघांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पवनकुमार याला अटक केल्यानंतर हा परवाना एजंट राहुल वाघमारे यांने दिल्याचे स्पष्ट झाले. 

त्यानंतर काल त्याला अटक करण्यात आली. हा परवाना महादेव पाटील या कंत्राटी कर्मचाऱ्याने दिला असल्याचे वाघमारे याने सांगितले. त्यानुसार त्यालाही अटक झाली. या प्रकरणात आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे. तपास सहायक निरिक्षक समीर ढोरे करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.