Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या कोळेकर जयसिंगपूरचे, फडणीस कुरुंदवाडचे, सिंदकर शाहूपुरीचे, मोरे वाहतूक शाखेचे प्रभारी

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या
कोळेकर जयसिंगपूरचे, फडणीस कुरुंदवाडचे, सिंदकर शाहूपुरीचे, मोरे वाहतूक शाखेचे प्रभारी



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 16 पोलिस निरीक्षक, 15 सहायक निरीक्षक यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुधवारी रात्री या बदल्यांचे आदेश दिले आहेत.

पूर्वी मिरज ग्रामीणचे प्रभारी असलेले संदीप कोळेकर यांची जयसिंगपूर येथे, संगलीतून बदलीवर गेलेले सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांची कुरुंदवाड येथे, सांगली शहरचे तत्कालीन निरीक्षक अजय सिंदकर यांची शाहूपुरी येथे तर नंदकुमार मोरे यांची कोल्हापूर शहर वाहतूक शाखा येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

निरीक्षक अविनाश कवठेकर यांची लक्ष्मीपुरी, मिरजेतील तत्कालीन निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांची शाहूवाडी, प्रकाश गायकवाड यांची पन्हाळा, स्नेहा गिरी यांची सुरक्षा शाखा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. मिरजेतील तत्कालीन निरीक्षक राजू ताशीलदार यांची इचलकरंजी पोलिस ठाण्यातून इचलकरंजी येथीलच शिवाजीनगर ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रवीण खानापुरे यांची इचलकरंजी गावभाग, किशोर शिंदे यांची हुपरी येथे, सत्यवान हाके यांची शहापूर येथे, कोल्हापूर विमानतळचे राजेंद्र मस्के यांची भुदरगड येथे, गजेंद्र लोहार यांची कागल येथे, विकास भुजबळ यांची सायबर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. ईश्वर ओमासे यांची राधानगरी येथे तर स्वाती गायकवाड यांची आर्थिक गुन्हे शाखेकडे नियुक्ती करण्यात आली आहे.

सहायक निरीक्षक अर्जुन पाटील यांची गांधीनगर, दिगंबर गायकवाड यांची गोकुळ शिरगाव, पंकज गिरी यांची शिरोली एमआयडीसी, जयसिंगपूरचे रणजित पाटील यांची कळे, संदीप कांबळे यांची नेसरी, राजीव पाटील यांची इचलकरंजी वाहतूक शाखा, सुनील माने यांची गगनबावडा, संगलीतून बदलून गेलेले कैलास कोडग यांची अधीक्षकांचे वाचक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सहायक निरीक्षक सागर पाटील यांची जुना राजवाडा, अभिजित पाटील यांची शिवाजीनगर, प्रशांत निशानदार यांची हातकणंगले, शिवाजी करे यांची करवीर, शीतल कोल्हाळ यांची शाहूपुरी, विकास अडसूळ यांची राजारामपुरी येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.