Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विट्यात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांची माहिती

विट्यात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक
पोलिस निरीक्षक संतोष डोके यांची माहिती



सांगली : खरा पंचनामा

सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना विटा परिसरात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून 83 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. 

सुधाकर ऊर्फ अक्षय सर्जेराव सरकाळे (वय 25, रा. हराळे मळा, विटा), मयूर वेंकट वाडेकर (वय 25, रा. मायाक्कानगर, विटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर विनायक शामराव महापुरे (रा. घानवड, ता. खानापूर) याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक श्री. डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. पथकाला दोघेजण चोरीची दुचाकी घेऊन विटा परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. 

पथकाने सापळा दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी विनायक महापुरे याच्या मदतीने चितळी (ता. खटाव), विटा, चिखली (ता. कडेगाव) येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करण्यात आली. तर सरकाळे याचा शोध पोलिस घेत आहेत.   

पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, सोमनाथ पाटील, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.