दोन पोलिसांसह पाच जणांविरुद्ध बलात्कार, अट्रोसिटीचा गुन्हा दाखल!
पुणे : खरा पंचनामा
पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील एका पोलिसासह दुसऱ्या एका पोलिसावर, महिलेवर आणि 2 अनोळखी व्यक्तींवर बलात्कार, अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 24 वर्षीय पिडीतेने तक्रार दिली आहे.
कादीर कलंदर शेख, समीर पटेल अशी संशयित पोलिसांची नावे असून त्यांच्यासह 2 अनोळखी व्यक्ती व एका अनोळखी महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बी. टी. कवडे रोडवरील श्रीनाथ कॉम्प्लेक्स आणि आंबेडकर चौकातील डायमंड क्वीन हॉटेल समोर घडली आहे.
गेल्या 3 वर्षापुर्वीपासुन ते दि. 1 जुलै 2023 दरम्यान हा गुन्हा घडला आहे. सदरील गुन्हा लष्कर पोलिस ठाणे येथुन सीसीटीएनएस प्रणालीत प्राप्त झाल्याने मुंढवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. कादीर कलंदर शेखला महिलेची संपूर्ण माहिती असताना देखील त्याने त्यांना लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले. वेळावेळी आळंदी येथे जावून लग्न करण्याचे बहाणे केले. प्रत्येक वेळी काही ना काही कारण देवून लग्न करण्यास टाळाटाळ केली.
लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर कादीर कलंदर शेखने पिडीत महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. दि. 1 जून 2023 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान आंबेडकर चौकातील हॉटेल डायमंड क्वीन येथे आरोपी कादीर शेख, समीर पटेल आणि इतरांनी पिडीत महिलेला मारहाण केली. कादीर शेखने त्यांचा मोबाईल हिसकावून नेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.