राहुल गांधींनी घेतली शरद पवार यांची भेट!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी नुकतीच पवार यांची पत्रकार परिषद संपली होती, जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी राहुल गांधी यांचे स्वागत केले. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड या तिघांशी राहुल यांनी सद्य राजकीय स्थितीवर चर्चा केली
त्यानंतर दिल्लीतील नेत्या सोनिया दुहान यांनी माध्यमांना माहिती दिली कि, राहुल गांधी यांनी पवार यांना आपण त्यांच्या समवेत असल्याचे सांगितले, बहुतेक सर्व विरोधी पक्ष आपल्या बरोबर असतील असा विश्वास देखील गांधी यांनी शरद पवार यांना दिला. ईडी, सीबीआयचा गैरवापर लोकशाहीला घातक ठरत असून यावर आता अॅक्शन घेण्याची वेळ आली आहे असेही दोघांत ठरले आहे. आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीस १०० टक्के कार्यकारिणीची उपस्थिती होती असेही त्या म्हणाल्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.