Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अखेर देवी तुळजाभवानी अभिषेकाची दरवाढ रद्द!

अखेर देवी तुळजाभवानी अभिषेकाची दरवाढ रद्द! 



तुळजापूर : खरा पंचनामा 

महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांपैकी एक देवी तुळजाभवानीच्या अभिषेक पूजेत तब्बल 10 पट वाढ करण्यात आली होती. त्यामुळे 50 रूपयांत होणारी अभिषेक पूजेसाठी भाविकांना 500 रूपये मोजावे लागणार होते. यामुळे भाविकांत नाराजी परली होती. तर विरोधही होत होता. 

त्यानंतर आता वाढ करण्यात आलेली दरवाढ मंदिर प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हिआयपी दर्शन देखील सुरू करण्यात आलं आहे. तुळजाभवानीच्या अभिषेकासाठी वाढीव दरवाढ ही लागू करण्याबाबत निर्णय झाला होता. 

तर तो उद्या सोमवार पासून लागू केला जाणार होता. मात्र या निर्णयाला भाविकांनी त्याच बरोबर पुजाऱ्यांनी विरोध केल्याने अखेर मंदिर प्रशासनाला हा निर्णय रद्द करावा लागला. तर मोफत व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.