Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पन्नास खोके एकदम ओके : अधिवेशनात विरोधक आक्रमक

पन्नास खोके एकदम ओके : अधिवेशनात विरोधक आक्रमक



मुंबई : खरा पंचनामा

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप करत घोषणाबाजी केली. माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि मुंबई काँग्रेसच्या प्रमुख वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमले होते. त्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले.

शिवसेनेकडून (ठाकरे गट) केवळ राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आंदोलनावेळी उपस्थित होते. 'सासूमुळे वाटणी झाली आणि सासू वाट्याला आली', अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. '५० खोके एकदम ओके' अशी जोरदार घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. 'घटनाबाह्य कलंकीत सरकारचा धिक्कार असो' अशा आशयाचे बॅनर यावेळी झळकविण्यात आले. या आंदोलनात शरद पवार यांच्या गटाचा एकही आमदार उपस्थित नव्हता.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यासह विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्य सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी चहापानाच्या निमंत्रणावर बहिष्कार टाकला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.