राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिंदे, पवार, फडणवीस यांची मोर्चेबांधणी!
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्यांवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. अखेर मंगळवारी (११ जुलै) ही स्थगिती उठवण्यात आली. यानंतर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी राज्य सरकारमध्ये नव्याने मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी सरकार काळात या नियुक्त्यां स्थगिती करण्यात आल्या होत्या.
आता ही स्थगिती उठवल्यानंतर विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या नियुक्त्यांसाठी भाजप, शिंदे गट आणि नव्याने सामील झालेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गटाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी राज्य सरकारचे सुत्रही ठरल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेवरील नव्या नियुक्त्यांसाठी सहा जागा भाजपच्या, तीन जागा शिंदे गटाला आणि तीन जागा अजित पवार यांच्या गटाला दिल्या जाऊ शकतात.
सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात ११ जुलैला सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या नियुक्त्या करण्यासंदर्भातले निर्देशही दिले. त्यामुळे लवकरच राज्यपालांकडून विधानपरिषदेवर आमदारांच्या नियुक्त्या केल्या जाऊ शकतात. एकीकडे राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेपाटपासंदर्भात चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे या निर्णयामुळे आता विधान परिषदेत कुणाची वर्णी लागणार, याकडेही उत्सुकता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राज्यपाल नियुक्त आमदारांची 12 नावे पाठवली होती. पण कोश्यारी यांनी या आमदारांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली नाही. यावरुन महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला. हा संघर्ष सर्वोच्च न्यायालायपर्यंत पोहचला. न्यायालायने सप्टेंबर २०२२ मध्येया आमदारांच्या नियुक्तींला न्यायालयाने स्थगिती दिली.पण मूळ याचिकाकर्त्याने ही याचिका मागे घेतल्याने न्यायालयाने या नियुक्त्यांवरील स्थगितीही उठवली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.