भिडेंचा भाजपशी काहीही संबंध नाही : राज्य सरकार योग्य कारवाई करेल!
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संभाजी भिडे हे भाजपचे पिल्लू असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे गप्प असलेल्या भाजपने आता या प्रकरणावर घुमजाव केले आहे.
संभाजी भिडेंचा भाजपशी कोणताही संबंध नाही, त्यांची स्वतःची संघटना आहे. त्याला मुद्दाम राजकीय रंग देण्याची गरज नाही, राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल' असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले की, 'मी संभाजी भिडेंच्या विधानाचा निषेध करतो. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांच्याकडे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेते म्हणून पाहिले जाते. त्यांच्या विरोधात केलेले वक्तव्य अयोग्य आहे, लोक ते खपवून घेणार नाहीत. याप्रकरणी राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल. संभाजी भिडेंचा भाजपशी कोणताही संबंध नाही. याला मुद्दाम राजकीय रंग देण्याची गरज नाही, असेही फडणवीस म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.