Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार समर्थक आमदार नाहीत?

मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार समर्थक आमदार नाहीत?



मुंबई : खरा पंचनामा

राज्यात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. रविवारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतल्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. अशातच आता उर्वरित मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महायुती सरकारच्या उर्वरित होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला मंत्रीपद मिळणार नसल्याचं समजते. 

लवकरच होणाऱ्या विस्तारात फक्त शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये मंत्रीपद समान वाटली जाणार असल्याची माहिती आहे. यात शिवसेनेच्या वाट्याला आणखी 7 मंत्रीपदं येणार असल्याची माहिती आहे.

अजितदादा गटाच्या आमदारांची सरकारमध्ये अचानक झालेली एँट्री आणि त्यांना तातडीने दिलेली मंत्रीपद यावरून शिवसेनेसोबत भाजप आमदारांमध्येही अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.