त्या खंजीरबाबत शालिनीताई यांच्याकडून शरद पवारांना क्लीन चिट!
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं वारंवार सांगितलं जातं. राजकीय विरोधकांकडून तर या मुद्दयावरून शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका केली जाते. या विषयावर शरद पवार यांनी वारंवार खुलासाही केला आहे. त्यावेळी काय घडलं होतं, नेमकी काय परिस्थिती होती याची माहिती शरद पवार यांनी सातत्याने दिली आहे. मात्र, तरीही शरद पवार यांना खलनायक केलं जात आहे.
आता अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार यांना त्यांच्या त्या बंडाची आठवण करून दिली जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी शरद पवार यांना क्लिनचीट दिली आहे. त्यामुळे पवारांवरील तो डाग पुसला गेल्याचं सांगितलं जात आहे.
शालिनीताई पाटली यांनी मीडियाशी संवाद साधताना ही क्लिनचीट दिली. शरद पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला. आज पेरलं तेच उगवलं असं वाटतं का? असा सवाल शालिनीताईना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं. कितीवेळ ते घेऊन चालायचं? खुद्द ज्यांच्या बद्दल अपराध केला, त्यांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही शरद पवार यांचं नेतृत्व माना. वसंतदादा पाटील यांना राज्यपालपद देण्यात आलं होतं. राज्यपाल म्हणून जाण्यापूर्वी त्यांनी माझ्यासह काँग्रेसच्या त्यावेळच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावलं. तुम्ही इथून पुढे शरद पवारांच्या नेतृत्वात काम करा. घडलेलं विसरून जा आणि शरद पवार यांचं नेतृत्व स्वीकारा, असं आम्हाला सांगितलं होतं, असं म्हणत शालिनीताई पाटील यांनी शरद पवार यांना क्लिनचीट दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.