घर, जमीन नावावर न केल्याने मुलाने केला वडिलांचा खून!
कडेगाव : खरा पंचनामा
कडेगाव तालुक्यातील विहापुर येथे घर आणि जमीन नावावर न केल्याने मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मुलाला अटक करण्यात आली आहे.
तानाजी यशवंत माने (वय 70) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा प्रदीप माने याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मृताची पत्नी मंगल माने यांनी फिर्याद दिली आहे.
तानाजी माने हे विहापुर येथील रहिवाशी असून ते शेती करीत होते. त्यांचा मुलगा प्रदीप याला दारूचे व्यसन आहे. गेल्या अनेक दिवसापासून तो घर आणि जमीन नावावर करा म्हणून वडीलाशी वाद घालत होता.
शनिवारी दुपारी प्रदीप दारू पिऊन घरी आला.
घरी वडील तानाजी माने यांच्यासोबत घर आणि शेतजमीन नावावर करण्याच्या कारणावरून वाद घालू लागला. त्यानंतर त्याने वडीलाना लाकडी दांडक्याने डोक्यात, खांद्यावर जबर मारहाण केली. त्यांचे तोंड व डोके फरशीवर आपटले. यामध्ये तानाजी हे गंभीर जखमी झाले.
त्यांना सांगली सिव्हीलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करून मुलाला अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.