उच्च न्यायालयाकडून राहुल गांधींची शिक्षा कायम!
अहमदाबाद : खरा पंचनामा
राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टाचा दिलासा नाहीच. मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
राहुल गांधी यांना सूरत न्यायालयानं दोषी ठरवून 23 मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा कायम असणार आहे. गांधी यांनी एका भाषणात मोदी आडनावाचे चोर असतात अशी टिप्पणी केली होती. याप्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याविरोधात गांधी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथेही त्यांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.