सांगलीतील मुख्यालयात आकाडी पार्टीचा 'बॉम्ब'!
सांगली : खरा पंचनामा
पुढील आठवड्यापासून श्रावण महिना सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या आकाडी पार्ट्या सुरू आहेत. दरम्यान सांगलीत मुख्यालय असणाऱ्या एका ठिकाणी बुधवारी रात्री आकाडी पार्टीचा 'बॉम्ब' जोरात फुटल्याची चर्चा आहे. या पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे.
आकाडी असल्याने एका मुख्यालयात जंगी पार्टीचे नियोजन करण्यात आले होते. या पार्टीला संबंधित विभागाचे प्रभारी यांच्यासह 35 ते 40 जण उपस्थित होते. पार्टी करणाऱ्यांनी मात्र पूर्ण खबरदारी घेतली होती. त्यामुळे फक्त जेवणच केले असे स्पष्टीकरण संबंधित देऊ शकतात.
या पार्टीसाठी बाहेरून मांसाहारी जेवण मागवण्यात आले होते. तर तळीरामना बाहेरूनच आवरून या अशा सक्त सूचनाही दिल्या होत्या.
सायंकाळी सातपासून सुरू असलेली पार्टी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र डॉक्टरांच्या भीतीने सर्व काळजी घेऊन ही पार्टी केल्याची चर्चा आहे. पण शासकीय कार्यालयात अशी पार्टी करता येते का हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.