प्रवीण बाबरला ५ जुलैपर्यंत कोठडी
दंडोबाच्या पायथ्याशी केले फायरिंगचे प्रॅक्टिस
नालसाब मुल्ला खून प्रकरण
सांगली : खरा पंचनामा
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, रेकॉर्डवरील गुन्हेगार नालसाब मुल्लाच्या खुनाच्या कटातील आणखी एका सूत्रधार प्रवीण अशोक बाबर याचा कळंबा कारागृहातून पोलिसांनी ताबा घेत त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान यातील मारेकऱ्यांनी दंडोबाच्या डोंगरात फायरिंगचे प्रॅक्टिस केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
मुख्य सूत्रधार सचिन डोंगरेसह तो ‘मोका’अंतर्गत गुन्ह्यात कारागृहात होता. तेथून त्याने हल्लेखोरांना दुचाकी पुरवण्यासह अन्य मदत केल्याचे तपासात पुढे आले. त्यानुसार कारवाई करण्यात आली होती. नालसाब मुल्ला खून प्रकरणी पोलिसांकडून मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे याची कसून चौकशी सुरू आहे. मुल्ला याच्यावर चौघांनी गोळीबार करत त्याचा निर्घृण खून केला होता.
या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे हा ‘मोका’ कारवाईअंतर्गत कळंबा कारागृहात होता. तेथूनच त्याने कट रचल्याची कबुली हल्लेखोरांनी दिली.
त्यानुसार पोलिसांनी डोंगरे याला अटक केली. डोंगरे आणि संशयितांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता हल्लेखोरांनी खुनापूर्वी दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी फायरिंगचे प्रशिक्षण घेतले असल्याची माहिती दिली.
सूत्रधार डोंगरे याची चौकशी केली असताना त्याचा साथीदार प्रवीण बाबर याचाही कटात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार न्यायालयाच्या परवानगीने ताबा घेण्यात आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.