Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत दोघांवर कोयत्याने खुनी हल्ला

सांगलीत दोघांवर कोयत्याने खुनी हल्ला



सांगली : खरा पंचनामा 

शहरातील मार्केट यार्ड परिसरात एका घराच्या टेरेसवर जुन्या वादाच्या कारणातून कोयत्याने डोक्यात, पाठीवर वर्मी वार करून दोघांवर खुनी हल्ला करण्यात आला. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी 6 जणांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल चौगुले, अजय खोत, अमित, रुपेश, अर्जुन (पूर्ण नावे नाहीत) आणि एक अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या हल्ल्यात करण संतोष पवार (वय २१ रा. अभिनंदन कॉलनी, शिंदे मळा) आणि सुलतान बशीर खलिफा हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी जखमी पवार याने विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे.

जखमी करण पवार हा त्याच्या कुटुंबियांसह शिंदे मळा येथील अभिनंदन कॉलनीत राहतो. करण आणि संशयित सहा जणांमध्ये पूर्वी भांडणे झाली होती. मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संशयित राहुल चौगुले याने करण पवार याला फोन करून मार्केटयार्ड येथील कब्रस्तानजवळ बंद असलेल्या घराच्या टेरेसवर बोलावून घेतले. यानंतर करण पवार आणि त्याचा मित्र सुलतान खलिफा हे दोघेजण त्याठिकाणी गेले. 

संशयितांनी दोघांसोबत जुन्या भांडणातून पुन्हा वाद घालण्यास सुरवात केली. दोघांमधील भांडण विकोपाला गेल्यानंतर संशयित चौगुले याने कोयत्याने पवार याच्या डोक्यात वार केला. संशयित अजय खोत याने त्याच कोयत्याने पुन्हा वार केले. यावेळी करण याचा मित्र सुलतान खलिफा हा भांडणे सोडवण्यासाठी आला असता संशयित खोत यांने त्याच कोयत्याने डाव्या बरकडीजवळ वार करुन त्याला जखमी केले. यावेळी इतर संशयितांनी दोघांना लाथाबुक्क्यानी मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी देत निघून गेले. याप्रकरणी सहा जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.