अजितदादांचे अर्थखाते जयंत पाटील यांच्यावर मेहरबान!
मुंबई : खरा पंचनामा
अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी खोचक टीका केली होती. तर जयंत पाटील यांच्यामुळेच राष्ट्रवादी फुटल्याचं चित्रं अजित पवार गटाने रंगवलं होतं. त्यामुळे जयंत पाटील हे अजित पवार गटासाठी खलनायक ठरले होते.
मात्र, अजित पवार यांचे अर्थखाते जयंत पाटील यांच्यावर मेहरबान असल्याचे दिसून आले. जयंत पाटील यांच्या मतदारसंघासाठी भरभरून निधी दिला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
अर्थमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच अजित पवार यांनी आपल्या आमदारांवर निधीचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांवरही निधीची प्रचंड खैरात केली आहे.
शिंदे गटाच्या आमदारांना निधी देऊन त्यांची नाराजी अजित पवार यांनी दूर केली आहे. मात्र, शिंदे गटाच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्वाधिक निधी देण्यात आल्याचं समजतंय. अजित पवार यांनी सुरुवातीलाच आपल्या आमदारांवर विकास निधीचा वर्षाव करून भविष्यातील निधी वाटपाचे संकेतच दिले असल्याचंही सांगितलं जात आहे.
अजित पवार यांनी अर्थमंत्रीपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या विकास कामांसाठी 1 हजार 500 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. त्यात आमदारांसाठी 25 ते 50 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रत्येकी 25 कोटींचा निधी देण्यात आला आहे. काही आमदारांना तर 40 कोटींचा निधीही दिल्याचं समजतंय. शिंदे गटाच्या काही आमदारांनाही निधी देऊन त्यांची नाराजी दूर केली आहे. मात्र, तुलनेने हा निधी कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.