Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील!

अजित पवार कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील!



परभणी : खरा पंचनामा

आता शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप सोबत असून, आगामी निवडणूक देखील तीनही पक्ष एकत्रच लढवणार असल्याचे दावे केले जात आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वाचं वक्तव्य केले आहे. आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये अजित पवार हे कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी परभणीच्या पाथरीतील एका सभेत केले असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे.

भाजपकडून घर चलो अभियान राबवले जात असून, या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शनिवारी पाथरी शहरात आले होते. यावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांशी भेट घेत संवाद साधला. दरम्यान, यावेळी त्यांची सभा देखील झाली. ज्यात त्यांनी पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. ज्यात बोलताना ते म्हणाले की, "बदलत्या राजकीय गणितात आता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीची महायुती आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपणही घड्याळ चिन्हाचा प्रचार करणार आहोत. 

भाजपला दिलेले मत विकासरुपाने परतफेड करण्याचा भाजपचा संस्कार आहे. तर आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये अजित पवार हे देखील कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील. मागील नऊ वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकोपयोगी केलेली कामे पाथरी मतदारसंघातील 60 हजार घरांत कार्यकत्यांनी पोहोचवावे, " असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.