शरद पवारांच्या दिल्लीतील बैठकीत महत्वाचे निर्णय!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावलेली. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समोर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी गटाला धक्का देणारा हा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच एस. आर. कोहली यांनादेखील निलंबित करण्यात आलं आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत याबाबत ठराव करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदास सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना याबाबत पत्र लिहिलं होतं. त्यांनी अजित पवार गटावर कारवाई करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांना केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी कारवाई केली आहे. पण त्यांच्या या कारवाईवर अजित पवार यांनी आक्षेप घेतला आहे.
शरद पवार यांनी बोलावलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज तासाभरापेक्षा जास्त वेळ चालली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित करण्यात आलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते एस. आर. कोहली यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पण या बैठकीत मंत्री छगन भुजबळ किंवा अजित पवार यांचं नाव नाही.
शरद पवार हेच आमचे मुख्य नेते आहेत. तेच आमच्या पक्षाबाबत निर्णय घेऊ शकतात, असाही एक ठराव सर्वांच्या सहमताने घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या बैठकीत 25 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यापैकी 22 महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अजित पवार यांच्या बंडाबाबत या बैठकीत सखोल चर्चा झालीय. या बैठकीत नेमकं आणखी काय काय निर्णय घेण्यात आले. याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात येणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.