कष्ट करून बांधलेल्या घरानेच घेतला जीव!
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूरमध्ये संततधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. आजरा तालुक्यातील किणे गावात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामध्ये एका महिलेचा राहत्या घरानेच जीव घेतला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
किणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे राहत्या घराची भिंत कोसळून सौ. सुनीता अर्जुन गुडूळकर या गंभीर जखमी झाल्या. यानंतर त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी नेण्यात आले मात्र वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्यासोबत वत्सला परसु गुडुळकर देखील जखमी झाल्या आहेत.
गुडूळकर कुटुंबीय हे येथील प्राथमिक शाळेसमोरील घरामध्ये राहत होते. सुनीता या गोठ्यामध्ये गेल्या असताना अचानकपणे मातीची भिंत कोसळली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.