Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'ते' पोलिस तात्काळ बडतर्फ होतील : गृहमंत्री

'ते' पोलिस तात्काळ बडतर्फ होतील : गृहमंत्री



मुंबई : खरा पंचनामा

अमली पदार्थांच्या विक्रीत सहाय्य करताना कोणी पोलिस आढळल्यास त्याला सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्याचसोबत केमिस्ट दुकानांत सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

आमदार रोहित पवार तसेच इतरांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. अमली पदार्थात सध्या कॅथा इड्युलिस खतची भर पडल्याचे पवार म्हणाले. तर जितेंद्र आव्हाड यांनी कफसिरप तसेच इतर गोळ्यादेखील अमली पदार्थ म्हणून वापरात असल्याचा मुद्दा मांडला.

एनडीपीएस हा केंद्राचा कायदा १९८५ सालचा आहे. त्यात तीन बदल सुचविण्यात आले आहेत. मुख्य सूत्रधाराला पकडण्यासाठी कंट्रोल डिलिव्हरी म्हणजे पूर्ण व्यवहार होईपर्यंत अटक न करणे, आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदत वाढवून १८० दिवस करणे. तसेच अमली पदार्थाची कमर्शियल क्वान्टिटी कमी करणे. उदाहरणार्थ, गांजाची कमर्शियल क्वान्टिटी २० किलो आहे. एखाद्याकडे १९ किलो गांजा सापडला तर तो स्वत:च्या वापराकरता ठेवल्याचे सांगून कमी शिक्षेत सुटका होते, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे त्या कायद्यात तीन बदल सुचवण्यात आले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.