विश्वजित कदम यांना विरोधी पक्षनेते पदी संधी द्यावी!
सांगली : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता राज्यात सध्या काँग्रेसचे संख्याबळ सर्वाधिक आहे, त्यामुळे डॉ. विश्वजीत कदम यांना विरोधीपक्ष नेते पदाची संधी द्यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी केली आहे. सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
ते म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये नको ते झालंय, राष्ट्रवादी मधून किती आमदार फुटले याबाबत आजून नेमके समजलं नाही, मात्र तरी देखील राष्ट्रीय काँग्रेस हाच पक्ष आता राज्यात दुसऱ्या क्रमांकाने आमदार संख्या असणारा पक्ष आहे, काँग्रेसचे आता ४४ आमदार आहेत, त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षाची संधी मिळणार आहे, या ठिकाणी काँग्रेसकडून डॉ विश्वजीत कदम यांना विरोधी पक्ष नेता म्हणून संधी द्यावी, अशी आम्ही सांगली जिल्हा काँग्रेसकडून मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.