'लंच टाईम'मध्ये काका-पुतण्यामध्ये गुप्तगू!
मुंबई : खरा पंचनामा
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. विधीमंडळातील अजित पवार यांच्या दालनात अर्ध्या तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमागे मतदारसंघातील वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
या भेटीनंतर आमदार रोहित पवार यांनी या भेटीबाबत माहिती दिली आहे. बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्याकडे तीन चार सामूहिक विषय घेऊन गेलो होतो. सरकारी परीक्षांची 1000 रुपये, 900 फी घेतली जात आहे. राजस्थान पॅटर्न नुसार 600 रुपये घ्यावी, यासंदर्भातील अजित पवार यांच्याकडे पत्र दिलं आहे.
मविआचा उपमुख्यमंत्री असताना एमपीएससी सदस्य वाढवण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. याबाबत आता आढावा बैठक घ्यावी अशी विनंती यावेळी रोहित पवार यांनी अजित पवारांना केली आहे. काही भरत्या राहिल्या आहेत, त्या लवकर करा. माझ्या मतदारसंघातील विषय, पीक विमा योजनेसाठी वेळ वाढवा तसेच माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीचा विषय आहे, तो निकाली लावण्यास सांगितलं अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.
कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीचा मुद्दा रोहित पवार यांनी सभागृहात मांडला होता. तर यासंदर्भात त्यांनी विधानभवनाच्या आवारात पावसात एकट्याने बसत आंदोलनही केलं होतं. तर या कारणासाठी रोहित पवार यांनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.