अजित पवार यांच्या बंडात रोहित पवार कोठे?
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार आता भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा पाठिंबा आहे, अशी शक्यता आहे. तसे पत्र ही त्यांच्याकडे असल्याचे शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नऊ आमदारानी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवारांनी हे बंड केलेलं असताना त्यांच्यासोबत बहुतांशी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा, आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र असे असले तरी राष्ट्रवादीचे युवा आमदार व पवार कुटुंबियातील नवोदित नेते रोहित पवार हे मात्र अजित पवारांसोबत दिसत नाहीत. अजित पवारांच्या या बंडात रोहित पवार कुठेच दिसत नाहीत.
यामुळे अजित पवारांच्या या बंडामध्ये रोहित पवारांची साथ नसल्याचे दिसत आहे. यामुळे अजित पवारांना बहुतांश नेत्यांना पाठिंबा आहे. मात्र रोहित पवारांच्या अनुपस्थिमुळे अजित पवारांच्या या बंडाला त्यांची साथ नाही का? अशी चर्चा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.