डीसीपी शशिकांत बोराटे यांनी घेतली चोरट्यांची ओळख परेड
पुणे : खरा पंचनामा
पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील झोन 4 मधील येरवडा, विमानतळ, चंदनगर, लोणीकंद, विश्रांतवाडी, खडकी व चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील जबरी चोरी करणाऱ्यांची डीसीपी (पोलिस उपायुक्त) शशिकांत बोराटे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात ओळख परेड घेतली.
यावेळी प्रत्येकाची गुन्हा करण्याची पध्दत तसेच त्याच्या गुन्हेगारी अभिलेखाचे आदान-प्रदान करण्यात आले. झोन 4 मधील 65 सराईत गुन्हेगारांच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यात आले.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झोन 4 मध्ये होणाऱ्या जबरी चोरीच्या घटनांना आळा बसवा म्हणून गुरूवारी येरवडा पोलिस ठाण्यात सराईतांची ओळख परेड घेण्यात आली. यावेळी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यासह झोनमधील सर्व एसीपी, पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
जबरी चोरीच्या गुन्हयांना आळा बसावा या उद्देशाने अशा प्रकारचे कार्यक्रम आगामी काळात देखील सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.