जिल्ह्यातील १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या
दोघांना मुदतवाढ तर एकाची बदली रद्द, ८ जणांच्या विनंतीनुसार बदल्या
सांगली : खरा पंचनामा
जिल्ह्यातील १३ पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दोन निरीक्षक दहा सहायक निरीक्षक तर एका उपनिरीक्षकाचा समावेश आहे. दोन सहायक निरीक्षकांना मुदतवाढ देण्यात आली आहे तर एकाची पूर्वी झालेली बदली रद्द करण्यात आली आहे. ८ अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी बदल्यांचे हे आदेश काढले आहेत.
निरीक्षक अरूण सुगावकर यांची गुप्तवार्ता कक्षाकडे तर श्रीकृष्ण कटकधोंड यांची वाचक १ म्हणून बदली करण्यात आली आहे. सहायक निरीक्षक सुशांत पाटील यांची सांगली ग्रामीणकडे, जयसिंग पाटील यांची शिराळा येथे, नितीन कुंभार यांची महात्मा गांधी चौक येथे, शिवानंद कुंभार यांची सांगली शहर येथे, मनोजकुमार लोंढे यांची संजयनगर येथे बदली करण्यात आली आहे. सहायक निरीक्षक समीर ढोरे यांना सांगली शहर येथे तर तासगावचे नितीन केराम यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तासगावचे सहायक निरीक्षक समीर तारडे यांची बदली रद्द करण्यात आली आहे.
सहायक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांची विट्याहून आटपाडी येथे, विशाखा झेंडे यांची तासगावहून महिला कक्षाकडे, सिकंदर वर्धन यांची आटपाडीहून एलसीबीकडे, सांगली ग्रामीणकडील प्रदीप शिंदे यांची दहशतवाद विरोधी पथकाकडे, शहरकडील विजय कार्वेकर यांची वाचक २ म्हणून बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.