ती एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण?
पुणे : खरा पंचनामा
अजित पवार यांनी भाजप- शिंदे सरकारसोबत सत्तेत सहभागी होत, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी मोठी फूट पडली आहे.
यानंतर राष्ट्रवादी कोणाची यावरुन वाद सुरु आहे, तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष व निवडणूक चिन्हावर आपला दावा केला आहे. तर शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्ये देखील भाजपाने फूट पाडली, यात भाजपा यशस्वी झाले. पण या फूटीमुळं राष्ट्रवादीतीने नेते व कार्यकर्ते खूप दुखावले असून, हे सर्व कोणी घडवून आणले, यामचा सुत्रधार कोण आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत असताना, आता यावर आमदार रोहित पवारांनी एक ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या सत्तानाट्यावर नाराजी व्यक्त करताना, भाजपावर जोरदार टिका केली आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत देखील फूट पाडली. "महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात तुडवणारी. मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेनेला आपापसात झुंजायला लावून विकृत आनंद घेणारी. आणि हाच प्रयोग आता राष्ट्रवादीच्या बाबतीत करणारी महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण असावी?", असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.