Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रिवॉर्ड पॉईंट बहाण्याने ४२ हजारांचा चुना : सांगली सायबरमुळे पैसे मिळाले!

रिवॉर्ड पॉईंट बहाण्याने ४२ हजारांचा चुना : सांगली सायबरमुळे पैसे मिळाले!



सांगली : खरा पंचनामा 

एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंटची रक्कम मिळवून देण्याच्या बहाण्याने विटा येथील एकास ४२ हजारांचा चुना लावण्यात आला. मात्र, सांगलीच्या सायबर शाखेने तात्काळ तांत्रिक तपास करत पैसे परत मिळवून दिले. 

विट्यातील अमृत जाधव यांना ११ जुलै रोजी एचडीएफसी बँकेतून बोलत असल्याचे सांगत मोबाईलवर फोन आला होता. यावेळी रिवॉर्ड पॉईंट मिळविण्यासाठी जाधव यांना एक लिंक देण्यात आली. ही लिंक उघडल्यानंतर जाधव यांच्या खात्यातील ४२ हजार रुपयांची रक्कम वजा झाली होती. यानंतर जाधव यांनी सांगली सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास करत चोरट्याचे बँक खाते गोठवून त्यातील ४२ हजारांची रक्कम परत मिळवले. 

सायबर शाखेने सखोल तांत्रिक तपास केल्याने ‘रनपैसा’ या पेमेंट प्लॅटफॉर्मवरून पैसे गेल्याच निदर्शनास आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.  दरम्यान, सायबर पोलिसांना गेल्या महिनाभरात चोरट्यांची खाते गोठवत एक लाख १७ हजारांची रक्कम गोठवली आहे. ८३ हजारांची रक्कम मिळवून देण्यात यश आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक संजय हारूगडे, उपनिरीक्षक रोहिदास पवार, अजय पाटील, स्वप्निल नायकोडे, विवेक साळुंखे यांनी ही कारवाई केली. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.