कोविड घोटाळा : संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरना अटक!
मुंबई : खरा पंचनामा
संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या सुजित पाटकर यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सुजित पाटकर यांच्याबरोबर आणखी दोन जणांना अटक करण्यात आली असून काही जणांवर अटकेची टांगती तलवार आहे.
लाईफलाईन हॉस्पिटॅलिटी सर्विसेस कंपनीकडून जंबो कोविड सेंटर उभारण्यात आलं होतं. या कंपनीच्या माध्यमातून अनेक व्यवहार करण्यात आले होते. कोविड काळात जे वैद्यकीय साहित्य खेरदी करण्यात आलं होतं, त्यामध्ये अनेक गैरव्यवहार आढळून आले होते. या सर्व व्यवहारांचे तपशील अंमलबजावणी संचालनालयाला हवे होते.
कोविड सेंटरमध्ये औषधे आणि इतर उपकरणांच्या किमती वाढवून सांगण्यात आल्या होत्या. कोविड सेंटर मध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहार ईडीला वाटत आहेत. लाईफलाईन हॉस्पिटॅलिटी सर्विसेसमध्ये सुजित पाटकर यांच्या बरोबरच आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. किशोर बिचुले यांनाही अटक करण्यात आली आहे.
याआधी कोविड जंबो सेंटर घोटाळ्या संदर्भात ईडीने १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी ईडीने डेप्युटी कमीशनर रमाकांत बिराजदार यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी ते सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंटचे प्रमुख होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.