Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

परराष्ट्र मंत्रालयातील आणखी एकजण हनी ट्रॅपच्या जाळ्यात!

परराष्ट्र मंत्रालयातील आणखी एकजण हनी ट्रॅपच्या जाळ्यात!



नवी दिल्ली : खरा पंचनामा

सध्या प्रदीप कुरुलकर यांचं हनीट्रॅप प्रकरण देशात गाजत असतानाच, परराष्ट्र मंत्रालयाचा एक कर्मचारी देखील अशाच प्रकारच्या ट्रॅपमध्ये अडकला असल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील हे प्रकरण आहे. या कर्मचाऱ्याने G20 परिषदेशी संबंधित काही गोपनीय फाईल्स एका ऑनलाईन फ्रेंडला पाठवल्याचं समोर आलं आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आऊटसोर्सिंग करून जे कर्मचारी तैनात केले होते, त्यांपैकीच एक हा कर्मचारी आहे. नवीन पाल असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. १२वी पास नवीन एमटीएस पदावर कार्यरत आहे. नवीन हा अज्ञात व्यक्तीला गोपनीय डॉक्युमेंट्स पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली.

यानंतर तपासात पोलिसांना नवीनकडे एक आयफोन आढळून आला. या आयफोनमध्ये G20 परिषदेशी संबंधित डॉक्युमेंट्सचे फोटो दिसून आले. या सर्व डॉक्युमेंट्सवर 'सीक्रेट' असं लिहिलं होतं. याव्यतिरिक्त काही डॉक्युमेंट्सचे स्क्रीनशॉट देखील मिळाले. हे सर्व फोटो त्याने 'अंजली कलकत्ता' नावाने सेव्ह असलेल्या एका नंबरवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शेअर केले होते.

पोलिसांनी जेव्हा नवीनची बँक हिस्ट्री तपासली, तेव्हा त्याच्या खात्यावर अज्ञात व्यक्तीने आतापर्यंत ८५ हजार रुपये भरल्याचं दिसून आलं. यामुळे, नवीन या गोपनीय फाईल्स विकत असल्याचं स्पष्ट झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीनची सोशल मीडियाच्या माध्यमातून अंजली नावाच्या तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी नंबर एक्सचेंज करून व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू केली होती. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांची ओळख झाली होती. अंजलीने आपण कोलकातामध्ये राहत असल्याचं सांगितलं होतं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.