Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जयंत पाटील यांच्याबाबत कोणतीही नाराजी नाही : रुपाली चाकणकर

जयंत पाटील यांच्याबाबत कोणतीही नाराजी नाही : रुपाली चाकणकर



सांगली : खरा पंचनामा

महिला आयोगात काम करताना किंवा यापूर्वी राष्ट्रवादीची महिला आघाडी सांभाळताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नेहमीच सहकार्य मिळाले. त्यांच्याकडून बळ मिळाल्याने संघटना कशी बांधावी याचे धडे मिळाले. शिवस्वराज्य यात्रेसारख्या अभियानातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी पाठबळ दिल्याने जयंत पाटील यांच्याबद्दल कोणतीही नाराजी नाही, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली  चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

त्या म्हणाल्या, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गेल्या १८- १९ वर्षांपासून संघटनेत कार्यरत आहे. जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. असे असताना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचे मिळालेले प्रदेशाध्यक्षपद अचानकपणे काढून घेण्यात आले. यात शरद पवार यांचा कोठेही संबंध नव्हता. ते सदैव माझे दैवतच आहेत. मात्र, पद काढून घेतल्याबद्दल महिला नेत्यांवर माझी नाराजी आहे, असेही त्या म्हणाल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.