खाते वाटपाचा तिढा कायम : फडणवीस दिल्लीला रवाना, अजितदादाही जाणार!
मुंबई : खरा पंचनामा
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीकडे रवाना झाल्याचं वृत्त आहे. नंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही दिल्ली जाणार आहेत.
काल रात्री खातेवाटपा संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उपस्थित होते. सोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. या बैठकीत अर्थ सोडून इतर सर्व खातेवाटप निश्चित करण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण अर्थ खात्यासंदर्भात निर्णय आज होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत झालेली चर्चा दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींना कळवली जाईल आणि तिथून होकार आल्यानंतर ताबडतोब खाते वाटप जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे, अशी माहितीही सुत्रांकडून कळते आहे. यामध्ये काही शिवसेनेची आणि काही भाजपची खाती राष्ट्रवादीला देण्यात येणार आहेत, असे समजते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.