Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील 'त्या' प्रसिद्ध पानपट्टी समोर भरदिवसा एकावर कोयत्याने हल्ला!

सांगलीतील 'त्या' प्रसिद्ध पानपट्टी समोर भरदिवसा एकावर कोयत्याने हल्ला! 



सांगली : खरा पंचनामा 

शहरातील सिव्हिल हॉस्पिटल ते शंभर फुटी रस्त्याकडे जाणाऱ्या रोडवरील एका प्रसिद्ध पानपट्टी समोर पुर्वी झालेल्या वादातून १९ वर्षीय तरूणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. भर दुपारी ही घटना घडली. दरम्यान, जखमी तरूणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

या हल्ल्यात काही गुन्हेगारांचा या समावेश असून पुर्वीच्या वादातूनही ही मारहाण केल्याचे समजते. जखमी तरूण हा शंभर फुटी रस्ता परिसरात राहतो. आज दुपारी तो कामासाठी गारपीर चौकात आला होता. तेथील एका पानपट्टीजवळ त्याने दुचाकी लावली होती. त्यावेळी सहा ते सात जण त्याच्याजवळ आले. त्यांनी पुर्वी झालेल्या वादातून पुन्हा वाद घालण्यास सुरूवात केली. अखेर एकाने कोयत्याने डोक्यात, कानावर, डोळ्यावर वार केले. त्यानंतर तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान, या मारहाणीत काही गुन्हेगारांचाही सहभाग असल्याची चर्चा होती. रात्री उशीरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.